Sunday, May 29, 2016

सैराट झाल जी

उभ्या महाराष्ट्राला सैराट करून सोडणारा "सैराट" उशिरा का होईना मी पहिला . ग्रामीण भागातून आलो असल्यानी चित्रपट हा अजून जवळचा वाटला. एका छोट्याश्या गावाची एक सुंदर प्रेम कहाणी नागराज मंजुळे नि अगदी भन्नाट पडद्यावर उतरवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल या चित्रपटात नवीन काय आहे, लैला-मजनू , हीर-रांझा, कयामत से कयामत तक पासून ते अगदी नवीन इशक्जदे पर्यंत आशिच स्टोरी आहे की . घरच्यांच्या मनाविरुद्ध प्रेम करतात, पळून जातात , हाल सोसतात आणि करुण अंत…… मान्य आहे के स्टोरी अगदी साधारण आहे पण ही साधारण वाटणारी कथा नागराज नी अगदी कल्पक्तने आणि प्रभावीपणे लोन्कांपर्यंत पोहचवली आहे. अतिशय भोळं आणि भाबड प्रेम , बालिश प्रेमाची गम्मत , अजाणतेपणी रंगवलेली ती स्वप्ने सगळ कस अगदी जवळच वाटल. जोशी बापटांचे तुळतुळीत सिनेमांमध्ये असा गावरान सिनेमा आपल वेगळं स्थान बनवून गेला. आपले स्वतःचे अनुभव नागराजन सिनेमात टाकून ते सेलेबल कशे बनवलेत हे सगळ त्याचाच कौशल्य आहे. fandry च्या विषयाशी साधारण जुळणारा विषय घ्यायची मोठी risk घेऊन नागराज नि कमाल केली आणि महत्वाच म्हणजे निखिल साने आणे नितीन केणी नी त्याच्यावर दखवलेला विश्वास .
या सगळ्या मध्ये अजय - अतुल च मन मुग्ध करून सोडणार संगीत ही एक जमेची बाजू आहे. सगळे sound tracks अप्रतिम आहेत . अजय - अतुल नेहमीच काही तरी नवीन दिला आहे. sony score च रेकॉर्डिंग हे त्यातलाच इक नाविन्यपूर्ण भाग. melodies music बरोबर गाण्यांचा picturisation तर वेड लावणारच आहे. expensive locations आणि सेट्स चा मोह टाळत सध्या सुध्या ग्रामीण locations चा क्वचितच असा वापर झाला असेल. romantic tracks आणि slow motions च combination नी तर अक्षरशः याड लवल. cinematography तर अप्रतीम . झिंगाट ची तर झिंग तरुणाईला अशी चढले की त्याच्या beats वर तीराखाणारी तरुणाई बघून पुन्हा कॉलेजात जावस वाटल तर नवल नाही. अस फार क्वचितच झालाय की सगळी च्या सगळी गाणी chart busters झाली आहेत. चिन्मयी श्रीप्रदा आणि श्रेया या दोन्ही अमराठी मुलीनी मराठीत झेंडा रोवला आहे. हार्मोनियम आणि लेखणी यांचा दुहेरी आव्हान अजय - अतुल नी लीलया पेललय.गावरान lyrics तर त्याचं होम पीच . परश्या आणि आर्ची च भांडण होत तेव्हा एक जुदाई वाला track टाकला असता तर थोडी अजून गम्मत आली असति.
charactes बद्दल बोलायचं तर अर्ची चा दमदार character हा सिनेमाचा सगळ्यात मोठा USP आहे. नागराज ने सादर केलेली अर्चि मनात घर करून जाते. तिची ठसकेदार मराठी, पाटलाच्या पोरीचा arrogance, I love you चा सहजपणा , bullet चालवणे , आणि पराश्यासाठी दाखवलेलं वेड प्रेम …बरच काही . परश्याच character script मध्ये जस वीक आहे तसच दाखवण्यात दिग्दर्शकाला यश अलय. त्याला glamour आणण्याचा जराही प्रयत्न केला नाही ही बाब सिनेमाला commercial सिनेमा मासून वेगळा करते. पर्ष्याचे मित्र, अर्चिऎचि मैत्रीण आणी हे सगळे characters एकदम realistic वाटतात . त्यांची नाव साल्या, बाळ्या , स्वप्नी आणि मंग्या … धमाल आहेत. . zingat चा dance परश्या नी जीव ओतून केलाय , लपून छपून नाचता नाचता केलेलं इशारे सगळ्या गोष्टी मजेशीर आहेत.
नागराज नी कितीही अमान्य केल तरी पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हा एकाच स्टोरी चा भाग असला तरी कॉलेज मधल्या बॉलीवूड टाईप दुनियेतून जेव्हा realistic दुनियेत जेव्हा दोघ येतात तेव्हा सिनेमा अगदी transform झाल्या सारखा वाटतो. असो पण सिनेमा आणि अर्ची दोघांनी महाराष्ट्राला याड लावलं हे मात्र खर.
‪#‎sairat‬ ‪#‎ajayatul‬ ‪#‎nagrajmanjule‬ ‪#‎zee‬ ‪#‎rinkurajguru‬ ‪#‎prashantthosar‬‪#‎marathicinema‬

0 Comments:

Post a Comment

<< Home

guide to home study and distance education
distance eduction learning guide